मालवण प्रशासनः मिरवणुका,स्पर्धा,कार्यक्रमांचे आयोजन न करण्याचे आवाहन…
मालवण ता.०२:
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर नारळी पौणिमा सण प्रथेप्रमाणे साजरा न करता योग्य ती दक्षता घेऊन साजरा करण्यात यावा, तसेच मिरवणूक,कोणत्याही स्पर्धा,अथवा कार्यक्रम करणे टाळावे,असे आवाहन मालवण पोलिस,तहसिलदार व वैदयकीय विभाग यांनी संयुक्तरीत्या केले आहे.याबाबत त्यांनी प्रसिध्दीपत्रक दिले.
यात त्यांनी असे म्हटले आहे की, कोरोनाचे संकट मोठे आहे. त्यामुळे गर्दी होवू नये ,याची खबरदारी घ्या, प्रथेप्रमाणे बंदर जेटी येथे येऊन सागराला नारळ अर्पण करण्याऐवजी आपल्या घराच्या बाजूला असलेल्या समुद्रात तो नारळ अर्पण करा,मिरवणूका काढु नका,बंदर जेटी परिसरात स्टॉल उभारु नका,असे म्हटले आहे.