Sunday, March 16, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासावंतवाडी कारागृहाच्या तत्कालीन जेलरला अखेर नागपुरात अटक...

सावंतवाडी कारागृहाच्या तत्कालीन जेलरला अखेर नागपुरात अटक…

पोलिस अधिक्षकांचा दुजोरा;दुस-या सहका-याच्या शोधात सिंधुदुर्ग पोलिस

सावंतवाडी/भक्ती पावसकर.ता,०२: येथील कारागृहात असलेला कैदी राजेश गावकर याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी गेले काही दिवस फरारी असलेला सावंतवाडी कारागृहाचा जेलर योगेश पाटील याला आज अखेर अटक करण्यात आली.ही कारवाई सिंधुदुर्ग पोलिसांच्या पथकाने नागपूर येथे केली,मात्र त्याचा सहकारी अद्याप पर्यंत आढळून आलेला नाही. याबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम यांनी दुजोरा दिलेला आहे.प्रकरण घडल्यानंतर यातील संशयित योगेश पाटील याने आपल्या सहका-या समवेत अंतरिम अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला होता. त्यानंतर सिंधुदुर्ग पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली.याबाबत जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक गेडाम यांच्याशी संपर्क साधला असता.
ते म्हणाले,नागपूर येथे पाटील याला ताब्यात घेण्यात आलेले आहे,येत्या दोन दिवसात त्यांना सिंधुदुर्गात आणले जाईल, मात्र दुसरा सहकारी अद्याप पर्यंत मिळाला नसून,सिंधुदुर्ग पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत आहे. पाटील याच्यावर अटकेची कारवाई करण्यासाठी मनसेचे माजी आमदार तथा नेते परशुराम उपरकर यांनी आंदोलनाची भूमिका घेतली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments