लुपिन फाऊंडेशनचा पुढाकार; शाळांना थर्मल गनची भेट…
बांदा,ता. ३ :लुपिन फाउंडेशनतर्फे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशांना छत्र्या वाटप करण्यात आल्या. कोरोना काळात लुपिनने जिल्ह्यातील जनतेच्या सेवेसाठी विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविले आहेत.
कोरोना संक्रमण काळात सेवा दिलेल्या व्यक्तींचा कोरोना योद्धा म्हणून सन्मानही करण्यात आला. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी आर्सेनिक अलब्म गोळ्यांचे वाटपही करण्यात आले. बांदा परिसरातील सर्व शाळांना थर्मल गनचे देखील वाटप करण्यात आले.
बांदा आरोग्य केंद्रातील आशा स्वयंसेवक व आशा प्रवर्तक यांचा छत्र्या देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी लुपिनकचे प्रकल्प अधिकारी नारायण परब, आनंद वसकर यांनी आशाना संबोधित केले. आशानी कोरोना काळात घरोघरी जाऊन जी आरोग्यसेवा दिली हे कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार भाग्यवंत, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते