बांदा.ता,०३: क्रांतिदिनाचे औचित्य साधून कोकण कला व शिक्षण विकास संस्था, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, अभिनव दर्पण प्रतिष्ठान-बांदा आणि बांदा रक्तदाता ग्रुप यांच्या सयुक्त विद्यमाने आणि ग्रामपंचायत बांदा यांच्या सहयोगाने ९ ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
कोरोनाच्या जैविक संकटामुळे सद्यस्थितीत रक्तपेढीना रक्ताचा तुटवडा भासत आहे. ही बाब लक्षात घेऊन रक्ताची गरज पूर्ण करण्यासाठी सामाजिक जाणिवेतून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हे शिबिर होणार आहे.
जास्तीत जास्त दात्यांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी दयानंद कुबल मो. ९३२४११७९१७ किंवा निलेश मोरजकर मो. ९७६३७१७७९० यांच्याशी संपर्क साधावा.
बांद्यात ९ ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES