मके विकणार्या कोमलचा सत्कार; युवा नेते योगेश दळवींचा पुढाकार…
कणकवली येथिल नाक्यावर मके विकून आपल्या कुंटूबाचा चरितार्थ चालविणार्या कोमल ज्ञानेश्वर इंगळे या मुलीसह रामेश्वर विद्यालय तळंगाव या शाळेच्या विद्यार्थ्याना येथिल कामगार सेनेच्या माध्यमातून शैक्षणिक साहीत्याचे वाटप करण्यात आले.जिल्हा कामगार सेनेच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शिवसेनेच्या युवा पदाधिकारी तथा खासदारांची कन्या रुची राऊत आणि कामगार सेनेचे जिल्हा सरचिटणीस योगेश दळवी यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले.
पालकमंत्री उदय सामंत,संघटनेचे अध्यक्ष निलेश उर्फ अप्पा पराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी रामेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.शिंदे,संस्थेचे सस्थाचालक सुर्यकांत दळवी,ग्रामपंचायत सदस्य महेश परब,राम राणे,राजू शेट्ये,अभय शिरसाट,राजन शिरोडकर,जीजी शिरोडकर,वैभव शिरोडकर आदी उपस्थित होते.