बांदा.ता,०३: डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघ मुंबई व प्रेरणांकुर रॉक्स यांच्या संयुक्तपणे आयोजित केलेल्या अॉनलाईन काव्य स्पर्धेत वृषभ बोरीकर यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. अक्षय इळके यांनी द्वितीय तर तृतीय क्रमांक हेमंत बारटक्के यांनी मिळविला. प्रेक्षक पसंतीचा मान सुप्रिया हळबे यांनी पटकाविला. मुंबई, पुणेसह कोकण व गोवा विभागातून स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
लॉकडानच्या काळात होतकरू कवीच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी संस्थेच्या वतीने काव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. २७ जून ते १२जुलै या कालावधीत ही स्पर्धा संपन्न झाली. ३ ते ७ मिनीटांची स्वरचित कविता चित्रीकरण करून त्याची व्हिडीओ क्लीप स्पर्धकांनी पाठविली होती. या स्पर्धेत जवळपास २७० स्पर्धकांनी अॉनलाइन सहभाग घेतला होता.
या स्पर्धेचा निकाल आज कवी, लेखक तथा दिग्दर्शक अभय पैर यांनी संस्थेच्यावतीने जाहीर केला. स्पर्धेसाठी समाजसेवक प्रसाद प्रभू, प्रेरणांकुर राँक्स या संस्थेचे जयेश चांदे, कवी ओमकार देसाई यांचे सहकार्य संस्थेला लाभले. संस्थेचे अध्यक्ष माजी आ. गुरुनाथ देसाई व सरचिटणीस उल्हास देसाई यांनी विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले आहे. विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके व गौरवपत्रे लवकरच प्रदान करण्यात येणार असल्याचे संस्थेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
आॅनलाईन काव्य स्पर्धेत वृषभ बोरीकर प्रथम…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES