Sunday, March 16, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याभाजपा युवा मोर्चा पदाधिकारी प्रितेश गुरव, कट्टर राणे समर्थक विजय माळकर यांच्यावर...

भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी प्रितेश गुरव, कट्टर राणे समर्थक विजय माळकर यांच्यावर गुन्हा दाखल…

क्वारंटाईन व्यक्तींचा व्हिडीओ काढून फेसबुकवर प्रसारित केल्याप्रकरणी कारवाई…

कुडाळ, ता. ४ : भडगाव खुर्द येथे संस्थात्मक क्वारंटाईन केलेल्या कक्षात प्रितेश गुरव व विजय माळकर यांनी प्रवेश करत ग्रामसनियंत्रण समिती व ग्रामपंचायतीची बदनामी होईल असा व्हिडीओ व मजकूर १५ जुलैला फेसबुक वरून प्रसारित केला. भडगाव सरपंच प्रणिता गुरव व उपसरपंच तुळशीदास (बाबी ) गुरव यांनी ही फेसबुक पोस्ट पाहिल्यावर विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन याबाबत तत्काळ या दोघांवर कारवाई व्हावी अशी तक्रार कुडाळ पोलिस ठाण्यात दिली.
नाहक बदनामी करणे, कोरोना संसर्ग आजाराबाबत जनतेमध्ये भीती निर्माण करणे, तसेच क्वारंटाईन केलेल्या कक्षात प्रवेश करून तेथील व्यक्तींमध्ये मिसळून साथरोग अधिनियमाचा भंग केल्याप्रकरणी कलम १८८, २६९, ५०१, ३४, २, ३, ४, ५४ च्या आधारे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
विजय माळकर या व्यक्तीबाबत यापूर्वी अनेक तक्रारी दाखल असल्याने या घटनेबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, अतुल बंगे, राजन नाईक, संजय भोगटे, सुशील चिंदरकर, राजू जांभेकर, राजू गवंडे, सुयोग ढवण, नितीन सावंत, सरपंच प्रणिता गुरव, उपसरपंच बाबी गुरव यांनी पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांची भेट घेऊन संबंधितांवर कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments