राजेश गावकर मृत्यू प्रकरण; दोन दिवसांपूर्वी नागपुरात झाली अटक….
कारागृहातील कैदी राजेश गावकर याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या सावंतवाडी कारागृहाचा तत्कालीन जेलर योगेश पाटील यांच्यासह त्याचा सहकारी झिलबा पांढरमिसे या दोघांना आज येथील न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्यांना अधिक तपासासाठी ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. दरम्यान सरकारी पक्षाच्यावतीने स्वप्निल कोलगावकर यांनी काम पाहिले.
याबाबत अधिक माहिती अशी की, हा प्रकार १९ फेब्रुवारीला घडला होता. मात्र घटनेनंतर हे दोघेही पसार झाले होते. त्या दोघांना दोन दिवसापूर्वी नागपूर येथे अटक करण्यात आली होती. काल दुपारी त्यांना जिल्ह्यात आणण्यात आले व त्यांची कोविड चाचणी करून त्यांना आज येथील न्यायालयात हजर करण्यात आले.