ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल ; वाघ पिंपळ येथील घटना..
मालवण, ता. ४ : मालवण बस स्थानक नजीकच्या वाघ पिंपळ येथे दुचाकीवरून जाणाऱ्या विवेक रवींद्र साळगावकर रा. कुंभारमाठ याच्यावर झाडाची फांदी पडल्याची घटना काही वेळापूर्वी घडली. यात त्याच्या डोक्यास, तोंडास गंभीर दुखापत झाली. त्याला तत्काळ शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी, किरण वाळके यांनी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविले.
कुंभारमाठ येथील विवेक साळगावकर हा युवक आज दुपारी दुचाकीवरून कामानिमित्त जात असता वाघ पिंपळ येथे एका झाडाची फांदी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे त्याच्या डोक्यावरच पडली. यात त्याच्या डोक्यास, तोंडास गंभीर दुखापत झाली. याची माहिती मिळताच तेथे असलेल्या बाबी जोगी, किरण वाळके यांनी त्याला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.