दोडामार्ग,ता.०४: तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने जोर धरला. दोन दिवस पडणाऱ्या संततधार मुळे नदी नाल्यांना पूर येऊन कॉजवे पाण्याखाली गेले. वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडली तर झाडांच्या फांद्या तुटून पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प होती. पर्यायी मार्गाने वाहातूक सुरू करण्यात आली मात्र पर्यायी मार्ग नसलेल्या ठिकाणची वाहतूक ठप्प होती . मुसळधार पावसामुळे तिलारी नदी दुथडी भरून वाहू लागल्याने काही गावांचा संपर्क तुटून जनजीवन विस्कळीत झाले .
रविवारी जोर धरलेल्या पावसाने आपली संततधार कायम ठेऊन मंगळवारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळू लागला . दिवस रात्र संततधार चालू असल्याने तालुक्यात नदी – नाले दुथडी भरून वाहू लागले . परिणामी ठिकठिकाणचे कॉजवे पाण्याखाली गेल्याने वाहतुकीस अडथळा झाला . तर सोमवारी मध्या रात्री वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी झाडे उन्मळून व मोठमोठ्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्याच्या घटना घडल्या . दोडामार्ग तिलारी राज्य मार्गावर साटेली-भेडशी येथे वावळे झाडाची भली मोठी फांदी तुटून पडली. ही घटना मध्यरात्री घडल्याने जीवित हानी किंंवा मोठी दुर्घटना टळली. फांदी मोक्याच्या ठिकाणी पडल्याने किरकोळ नुकसान वगळता मोठी हानी झाली नाही. तसेच
गोवा सिमी लगत मोठे झाड पडल्याने दोडामार्ग गोवा मार्गावरीलही वाहतूक खोळंबली होती. हे झाड विद्युत वाहिन्यावर पडल्याने वाहिन्या जमीनदोस्त झाल्या. त्यामूळे याभागातील वीज संपूर्ण दिवसभर गायब होती.
मुसळधार मुळे काही ठिकाणचे कॉजवे पाण्याखाली गेले. तिलारी नदी दुथडी भरून वाहत असल्याने घोटगे – परमे , घोटगेवाडी , कॉजवे पाण्याखाली होते . परिणामी येथील गावांचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटला.
दोडामार्गात मुसळधार; तिलारी नदीवरील घोटगे-परमे पूल पाण्याखाली…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES