डॉ. धनंजय चाकूरकर; जिल्ह्यात १०९ सक्रिय रुग्ण…
सिंधुदुर्गनगरी,ता.०४: जिल्ह्यात आजपर्यंत एकूण ३०५ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १०९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १५ व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामध्ये कणकवली तालुक्यातील १२ आणि सावंतवाडी तालुक्यातील २ आणि वेंगुर्ला तालुक्यातील १ व्यक्तीचा समावेश आहे. जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या सर्व प्रवासी नागरिकांसाठी १४ दिवसांचे अलगीकरण बंधनकारक राहणार आहे. तसेच सर्व तपासणी नाक्यांवर आवश्यकेनुसार स्त्रावनमुने घेण्याची कार्यवाही सुरू आहे. कोवीड-19 च्या चाचणी अहवालाची माहितीकरिता सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या वेळे ०२३६२-२२९०४० या क्रमांकाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी केले आहे.