चार विशेष पथक तैनात ; नगराध्यक्षांनी घेतला आढावा…
मालवण, ता. ४ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवण शहरात जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासाठी शहरातील चार प्रवेश मार्गांवर विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
दरम्यान नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बांधकाम सभापती यतीन खोत यांनी मंगळवारी प्रवेश मार्गांवर भेट देत कामाचा आढावा घेतला. तसेच मुंबई व अन्य जिल्ह्यातून आलेल्या काही वाहनातील प्रवाशांची स्वतः माहिती घेत प्रवासी पास बाबतही खात्री केली.
तपासणी दरम्यान मुंबई किव्वा अन्य जिल्ह्यातून प्रवासी घेऊन येणाऱ्या वाहनांचे क्रमांक, प्रवाश्यांचा नाव पत्ता नोंद केला जात आहे. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात आरोग्य तपासणी करून गृह अथवा संस्थात्मक कॉरंटाईन बाबत निर्णय घेतला जात आहे. शहरालगत अन्य गावात जाणाऱ्या वाहनांचीही नोंद ठेवली जात आहे. जिल्ह्याबाहेरून शहरात दाखल होणाऱ्या व्यक्तीकडे प्रवासी पास असले तरच शहरात प्रवेश दिला जात आहे.
आगामी काळात शहरात येणाऱ्या मुंबईस्थित चाकरमानी व अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाश्यांनी मालवणात येणापूर्वी नगरपालिकेकडे नोंद करावी. जेणेकरून चाकरमान्यांची व्यवस्था करणे सुलभ होईल. पालिका कर्मचारी सुधाकर पाटकर ९४०३५५८५७७ जयसिंग गावित ९९२३८७१०३५, सुनील चव्हाण ९४२११४४३१० यांच्याशी संपर्क साधून येणाऱ्या व्यक्तीनी माहिती द्यावी. जेणेकरून क्वारंटाइन व्यवस्था करणे सोपे होईल. तरी चाकरमान्यानी आगाऊ नोंदणी करा असे आवाहन नगराध्यक्ष श्री. कांदळगावकर यांनी केले.