नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले; भुईबावडा परिसरात वीजेचा लपंडाव…
वैभववाडी/पंकज मोरे,ता.०४: तालुक्यात सलग दोन दिवस वादळी वा-यासह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. धो-धो कोसळणा-या पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. तर भुईबावडा परिसरात सोमवारी मध्यरात्रीपासून जोरदार वादळी वा-यासह पाऊस बरसत आहे. यामुळे मंगळवारी सकाळपासूनच विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. रात्री उशिरापर्यंत पावसाची संततधार सुरूच होती.
तालुक्यात सलग दोन दिवसापासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली. मंगळवारी दिवसभर पावसाची संततधार सुरूच असून नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. मध्यरात्रीपासून भुईबावडा परिसरात जोरदार वादळी वा-यासह पाऊस कोसळत आहे. मंगळवारी सकाळपासून विजेचा लपंडाव सुरू आहे.