चौपदरीकरण मोबदला,हायवे काम दर्जा,वृक्ष लागवड कार्यवाहीची मागणी…
कणकवली, ता.०४: तालुका काँग्रेस (आय)चे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर हे उद्या (ता.5) पासून प्रांताधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहेत.त्याबाबतची माहिती त्यांनी पत्रकातून दिली आहे.महामार्ग चौपदरीकरणात ज्यांचा मोबदला लवादाकडे प्रलंबित आहे. त्या सर्व दाव्यांचा निकाल तातडीने देण्यात यावा. ज्या प्रकल्पबाधितांना लवादाकडून भरपाई मंजूर झाली, त्यांची कार्यवाही तातडीने व्हावी. तर ज्या केसेस जिल्हा कोर्टामध्ये वर्ग आहेत, त्यांच्यासाठी स्वतंत्र कोर्ट नेमावे. हायवेच्या कामाच्या दर्जाची पाहणी होऊन दुरूस्तीची कार्यवाही व्हावी आदी मागण्या श्री.मांजरेकर यांनी केल्या आहेत.