Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
वेंगुर्ले ता.०४: टांक-सागरतीर्थ किनाऱ्यावर उसळणार्या लाटांमुळे समुद्रा बाहेर फेकल्या जाणाऱ्या कासवांच्या पिल्लांना आज तेथील ग्रामस्थांनी जीवदान दिले.यावेळी सागरी सुरक्षा रक्षक अमेय आसोलकर व गजानन तांडेल यांनी त्या पिल्लांना समुद्राच्या आत नेऊन सोडले.
श्री.असोलकर व श्री.तांडेल यांना आज समुद्री कासवांची दीड-दोन फूट लांबीची पिल्ले समुद्री लाटांबरोबर बाहेर फेकली जात असताना आढळून आली.दरम्यान त्यांनी प्रसंगावधान दाखवत त्या पिल्लांना पकडून समुद्राच्या आत नेऊन सोडले.
Download WordPress Themes Nulled and plugins.