Sunday, March 16, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याबांदा आळवाडी बाजारपेठेत पाणीच पाणी...

बांदा आळवाडी बाजारपेठेत पाणीच पाणी…

मध्यरात्रीची घटना;गतवर्षीच्या आठवणीने ग्रामस्थांत भितीचे वातावरण

 

बांदा
काल रात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने तेरेखोल नदीला पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. पुराचे पाणी मध्यरात्री शहरातील आळवाडी बाजारपेठेत घुसले. यामुळे येथील व्यापाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. सकाळी पावसाचा जोर कायम असल्याने पाण्याची पातळी वाढत आहे. यामुळे येथील व्यापारी व स्थानिक रहिवाशी हे भीतीच्या छायेखाली आहेत.
रात्रीपासून बांदा दशक्रोशीला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. गतवर्षी संपूर्ण बांदा शहर पुराच्या पाण्याखाली गेल्याने एकच हाहाकार माजला होता. त्यामुळे गतवर्षीच्या पुराच्या आठवणीने बांदा व्यापारी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तेरेखोल नदी दुथडी भरून वाहत आहे. आज पहाटेच नदीचे पाणी पात्राबाहेर येऊन आळवाडी बाजारपेठेत घुसले. शहरातील छत्रपती शिवाजी चौक ते आळवाडी मच्छीमार्केट रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. येथील दुकानांमध्ये रात्रीच पुराचे पाणी शिरल्याने सर्वांची तारांबळ उडाली आहे. पाण्याची पातळी वाढत असल्याने स्थानिक ग्रामस्थ व व्यापारी यांनी तात्काळ दुकानातील सामान सुरक्षितस्थळी हलविण्यास सुरुवात केली आहे. आळवाडी बाजारपेठेतील चिकन, मटण, मच्छी विक्रेते यांना पुराच्या पाण्याचा सर्वाधिक फटका बसला आहे.
पाण्याची पातळी वाढत असल्याने प्रशासनाने सतर्क राहण्याबाबत सूचना व्यापाऱ्यांना दिल्या आहेत. बांदा परिसरातील ग्रामीण भागात ठिकठिकाणी भातशेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments