भुईबावडा परिसरात वादळी वा-यासह जोरदार पाऊस; भुईबावडा परिसरात वीज गायब…
वैभववाडी/पंकज मोरे,ता.०५:तालुक्यात सलग तीन दिवस वादळी वा-यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. धो-धो कोसळणा-या पावसामुळे नदी, नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर भुईबावडा परिसरात सलग दोन दिवस विजेचा लपंडाव सुरू आहे. बुधवारी सकाळपासूनच मुसळधार पावसाने जोरदार बॕटींग करायला सुरूवात केली आहे.
तालुक्यात सलग तीन दिवसापासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली. मुसळधार पावसामुळे नदी, नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. बुधवारी सकाळपासून धुवाधार पावसाला सुरूवात झाली आहे. तर भुईबावडा परिसरात जोरदार वादळी वा-यासह पाऊस कोसळत आहे. यामुळे तब्बल दोन दिवस या परिसरात विजेचा लपंडाव सुरू आहे.