घारपीचा संपर्क तुटला; अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका…
सावंतवाडी,ता.०५: काल पासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने असनिये-घारपी मार्गावर रस्त्याकडेला असलेली दरड कोसळून हा मार्ग वाहतुकीस बंद झाला आहे.दरड रस्त्यावर आल्याने घारपी गावाचा संपर्क तुटला असून पावसाचा वाढणारा जोर पाहता असनिये-घारपी रस्त्यावर अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका आहे.
गतवर्षी याच दरम्यान कणेवाडी येथे भूस्खलन होऊन हा मार्ग बंद झाला होता.त्यामुळे घारपी गावाचा संपर्क तब्बल पंधरा दिवस तुटला होता.तर कणेवाडी ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यात आले होते.आज कोसळलेली दरड गतवर्षी भूस्खलन झालेल्या परिसरानजिकच आहे. या ठिकाणी गतवर्षीही काही प्रमाणात दरड कोसळली होती.दरम्यान कालपासून तुफान कोसळणाऱ्या पावसाने या ठिकाणी दरडीचा मोठा भाग रस्त्यावर येऊन हा मार्ग बंद झाला आहे.