ग्रामीण भागात सलग दोन दिवस विजेचा लपंडाव सुरू; तालुक्यात पावसाची जोरदार मुसंडी…
वैभववाडी,ता.०५: वैभववाडी तालुक्यात सलग तीन दिवस मुसळधार पाऊस सुरु आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहात आहेत. मंगळवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने उंबर्डे मेहबुबनगर येथे दुकानावर झाड कोसळून नुकसान झाले आहे. करुळ घाटात किरकोळ पडझड सुरु आहे.
रविवारी दुपारपासून तालुक्यात पावसाची संततधार सुरु आहे. मंगळवारी सकाळपासून दिवसभर मुसळधार पाऊस कोसळत होता. उंबर्डे मेहबुबनगर येथील दाऊद याकूब बोबडे यांच्या दुकानावर झाड कोसळून दुकानाचे सुमारे ४ हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. गेल्या चोविस तासात तालुक्यात १२८ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. दिवसभर पडणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
दरम्यान गेले दोन तीन दिवस तालुक्यात शहरी भागासह ग्रामीण भागात वीजेचा लपंडाव सुरु आहे. वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्यामुळे नागरीक हैराण झाले आहे. वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली जात आहे.