चैतन्य सावंत; विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून केली मागणी…
सावंतवाडी,ता.०५: ऐतिहासीक परंपरा लाभलेेल्या विजयदुर्ग किल्ल्याची तातडीने दुरुस्ती करा,अशी मागणी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून तालुकाध्यक्ष चैतन्य सावंत यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी निवेदन प्रसिध्दीस दिले आहे.त्यात असे नमुद करण्यात आले आहे की,किल्ले हे देशाचे मानबिंदू,सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी अनेक किल्ले व जलदुर्ग बांधले. मात्र अनेक वर्षात किल्ल्यांची झीज झाल्यामुळे अनेक किल्ल्यांची पडझड होत आहेत. आपला ऐतिहासिक वारसा जतन करायचा असल्यास किल्ल्यांची वेळेतच डागडुजी होणे गरजेचे आहे. विजयदुर्ग किल्ला हा मराठा आरमाराचे नाविक तळ होते.अनेक वर्षे किल्ल्याची डागडुजी न केल्याने हळहळ बुरुज,तटबंदी या ढासळत आहे.या किल्ल्याला भेट देण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येत असतात. यात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर येत असतात. याच पर्यटनावर अनेक कुटुंब ही उदरनिर्वाह करीत आहे.
हा सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी केंद्रीय सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने विजयदुर्ग किल्ल्याची डागडुजी करावी अशी मागणी सावंतवाडी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनेे केली आहे