बांदा,ता.०५:मडूरा माऊली मंदिरनजीक शेर्लेकरवाडीकडे जाणार्या ओहोळावरील पूल ठिकठिकाणी खचल्याने वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. सदर पूल कमी उंचीचा असून संपूर्ण पूलाला भगदाडे पडली आहेत. पूलाच्या दुरूस्तीसाठी ग्रामपंचायत प्रशासन व संबंधित बांधकाम विभागाचे वारंवार लक्ष वेधूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. येत्या आठ दिवसात पूल दुरूस्ती संदर्भात ठोस कार्यवाही न झाल्यास स्वातंत्र्यदिनी सावंतवाडी तहसील कार्यालयासमोर उपोषण छेडण्याचा इशारा भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते अर्जुन शेर्लेकर व प्रकाश सातार्डेकर यांनी लेखी निवेदनाद्वारे सावंतवाडी तहसीलदारांना दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मडूरा – शेर्लेकरवाडीकडे जाणार्या मार्गावरील पूल वाहतुकीस धोकादायक बनला आहे. त्यामुळे वाडीतील ग्रामस्थांचा संपर्क तुटला आहे. प्राथमिक शाळेत जाणार्या विद्यार्थ्यांना तर धोक्यात जीव घालून शाळेत जाणे भाग पडते. गेली काही वर्षे स्थानिकांनी श्रमदानाने डागडुजी केली. मात्र, सध्या संपूर्ण पूल भगदाडांमुळे धोकादायक बनला आहे.
पूलाच्या दुरूस्तीसाठी भाजप कार्यकर्ते तात्या शेर्लेकर यांनी प्रशासन पातळीवर सातत्यपूर्ण पाठपुरावा केला आहे. मात्र अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही न झाल्याने १५ अॉगस्ट रोजी सावंतवाडी तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
मडुरा शेर्लेकरवाडी पूलाच्या दुरूस्तीसाठी स्वातंत्र्यदिनी उपोषण…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES