Tuesday, March 18, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यागणेशोत्सव काळातील शासनाच्या निर्णयानंतर सरपंच संघटना राजीनामे देणार का...?

गणेशोत्सव काळातील शासनाच्या निर्णयानंतर सरपंच संघटना राजीनामे देणार का…?

कुणाल किनळेकर; चाकरमान्यांना नाहक त्रास दिल्यास मनसे गप्प बसणार नाही…

कुडाळ ता.०५: गणेश चतुर्थीसाठी कोकणात येणाऱ्या चांकरमान्याचा विलगीकरण कालावधी दहा दिवस ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.तसेच त्यांना एसटीतून गावागावात सोडले जाणार आहे.त्यामुळे वारंवार दंड व नियमावली तयार करून चाकरमान्यांची दिशाभूल करणारे सरपंच संघटनेचे पदाधिकारी आता आपल्या पदाचे राजीनामा देतील काय?,असा खोचक सवाल मनविसेचे जिल्हाध्यक्ष कुणाल किंनळेकर यांनी उपस्थित केला आहे.दरम्यान कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना कोणी नाहक त्रास देत असेल,तर आम्ही गप्प बसणार नाही,आणि तसा प्रकार कोठे घडल्यास मनसेशी संपर्क करा,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

त्यात असे म्हटले आहे की, शासनाने कालच १० दिवस होम क्वारंटाईन म्हणजेच १२ तारखेपर्यंत केल्याची घोषणा करून १२ तारखेनंतर स्वॅब टेस्ट करून गणपती दिवसापर्यंत येण्याची मुभा देऊन १० दिवस होम क्वारंटाईन होऊन गावागावात थेट एस.टी. सोडण्याचा निर्णय घेतला आहे.याबाबत ज्या-ज्या सरपंच संघटनेने राज्याने घ्यावयाचे निर्णय स्वत:च घेऊन दंड व नियमावली तयार करून सातत्याने वृत्तपत्रात देऊन चाकरमान्यांना मनस्ताप दिला.त्या सरपंच संघटना आता आपल्या सरपंच संघटना पदाचा राजीनामा देण्याची हिम्मंत दाखवतील काय?
कायद्याच्या तरतुदीमध्ये आपत्कालीन कायद्यात कोरोना संसर्ग साथीचा निर्णय असताना राज्य सरकारचे अधिकार सरपंच संघटना वापरून जणू काय आपण गावातल्या जनतेची काळजी घेतो,असा अभास दाखवण्याचा प्रयत्न करत होते.तिच सरपंच संघटना गावातल्या होणाऱ्या भ्रष्टाचाराबाबत खड्डे पडलेल्या रस्त्याबाबत अपूऱ्या आरोग्य सेवेबाबात आत्ता तरी आवाज ऊठवतील काय, असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे.
चाकरमान्यांना ७ तारखेपर्यंत गावात घेणार, त्यानंतर आलेल्या लोकांवर कारवाई करणार,अशी घोषणा करणारे सरपंच मुंबईवरून आलेल्या चाकरमान्यांना राजकीय वैयक्तीक वैमनस्यातून त्रास देण्याचा प्रयत्न केला.तर चाकरमान्यांनी पोलिस स्टेशन व तहसिलदारांकडे तक्रार करावयाची आहे.चाकरमान्यांनी होम क्वारंटाईन व सोशल डिस्टंसिंगची नियमावली तंतोतंत पाळावयाची आहे.मात्र तरीही चाकरमान्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments