Tuesday, March 18, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याअयोध्येत गेलेल्या कारसेवकांचा सन्मान...

अयोध्येत गेलेल्या कारसेवकांचा सन्मान…

राममंदिरच्या शिलान्यासाचा ऐतिहासिक सोहळा मालवणात उत्साहात…

मालवण,ता.०५: अयोध्येतील राममंदिराच्या शिलान्यासाचा ऐतिहासिक सोहळा मालवणात भाजपच्या वतीने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून साजरा करण्यात आला.भरड नाक्यावर प्रभू रामचंद्रांच्या भव्य प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर बाजारपेठेतील हनुमान मंदिरात घंटानाद करण्यात आला.त्यानंतर भाजपच्या कार्यालयात १९९२ साली अयोध्येत गेलेल्या मालवणमधील कारसेवकांचा सत्कार करण्यात आला.मालवणात भाजपच्या वतीने या ऐतिहासिक सोहळ्या निमित्त दिमाखदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसातही हा कार्यक्रम तेवढ्याच उत्साहात साजरा झाला.यावेळी डॉ. सुभाष दिघे यांच्यासह भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, दीपक पाटकर, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, बाबा परब, विजय केनवडेकर, महेश मांजरेकर, विलास हडकर, नगरसेवक आप्पा लुडबे, पूजा करलकर, ममता वराडकर, दिलीप कांबळी, बबलू राऊत, चंद्रवदन कुडाळकर, महेश सारंग, भाई मालवणकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. सर्वप्रथम भरड नाक्यावर प्रभू रामचंद्राच्या भव्य प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून रामचंद्राचा जयजयकार करण्यात आला.तर याठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करून पेढे आणि जिलेबी वाटप करण्यात आले. यानंतर बाजारपेठेतील हनुमान मंदिरात घंटानाद करण्यात आला. तर भाजपच्या कार्यालयात १९९२ रोजी अयोध्येत गेलेल्या कारसेवकांचा सत्कार करण्यात आला. सत्कारमुर्तींमध्ये डॉ. सुभाष दिघे यांच्यासह दादा सामंत, त्यांचे सुपुत्र भाऊ सामंत, अरुण सुर्वे, कृष्णा वराडकर, विलास हडकर यांचा समावेश होता.
यावेळी डॉ. सुभाष दिघे यांनी सत्काराला उत्तर देताना १९४८ पासूनची अयोध्येतील परिस्थिती, कोठारी बंधूंचे हत्याकांड आणि ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत बाबरी मशिदीच्या ढाच्याचे झालेले पतन याबाबत सविस्तर माहिती दिली.सिंधुदुर्गात त्याकाळी झालेल्या जनजागृतीबाबत देखील त्यांनी सविस्तर विवेचन केले.अयोध्येतील राम मंदिराची उभारणीचा क्षण हा समस्त हिंदू धर्मियांसाठी आनंदाचा क्षण असल्याचे ते म्हणाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास हडकर,सूत्रसंचलन महेश मांजरेकर यांनी केले तर धोंडू चिंदरकर यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments