भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी…
वैभववाडी,ता.०५: श्री राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यानिमित्त वैभववाडी तालुक्यात विविध ठिकाणी मंदिरांमध्ये भाजपा कार्यकर्त्यांच्या उपस्थित अभिषेक, महाआरती व घंटानाद कार्यक्रम पार पडला. भक्तिमय वातावरणात सर्वत्र हा सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने राम भक्त, भाविक व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
नाधवडे येथील ब्राह्मणदेव मंदिर, लोरे नंबर २ गांगो चाळा मंदिर, कोकिसरे नारकरवाडी येथील अंबाबाई मंदिर, उंबर्डे येथील महालक्ष्मी मंदिर, कुर्ली येथील कुर्लादेवी देवालय, तिथवली येथील गांगेश्वर मंदिर, वैभववाडी, आचिर्णे या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.