Sunday, March 16, 2025
Google search engine
Homeताज्या घडामोडीखाजगी वाहनचालकांनी चाकरमान्याची लूटमार थांबवा

खाजगी वाहनचालकांनी चाकरमान्याची लूटमार थांबवा

  • वैभववाडी/प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर लाॕकडाऊन सुरू आहे. याचा मोठा फटका कोकणातील चाकरमान्यांना बसत आहे. नोकरीनिमित्त मुंबई, पुणे येथे अडकलेले चाकरमानी गणपती उत्सवासाठी गावी येत आहेत. परंतु एस. टी. आणि रेल्वे वाहतूक बंद असल्याने खाजगी ट्रॅव्हल्सवाले या संधीचा गैरफायदा घेऊन प्रति प्रवासी रुपये २५०० ते ३००० इतके भाडे घेत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. या लाॕकडाऊनच्या काळात सर्व व्यवहार ठप्प झाले असून सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. अशा परिस्थितीत खासगी ट्रॅव्हल्सवाले या गणपती उत्सवाचा गैरफायदा घेऊन प्रवाशांसी आर्थिक लूटमार करत आहेत.
    या खाजगी ट्रॅव्हल्सवाल्यांकडून प्रवाशांची होणारी लूटमार थांबण्या संदर्भात शासनाने एसटी भाड्याच्या दीडपट भाडे घेण्याबाबतचे परिपत्रक जारी केलेले आहे. त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी आपल्या विभागाकडून व्हावी.सध्या मुंबईवरून कोकणात येणाऱ्या सर्वच ट्रॅव्हल्स कंपनींना याबाबत कल्पना देऊन प्रति प्रवासी एसटी भाड्याच्या दीडपट भाड्यापेक्षा जास्त भाडे आकारणाऱ्या ट्रॅव्हल्स कंपनीवर योग्य ती कारवाई करण्यात यावी. तसेच प्रवासी दरफलक प्रत्येक ट्रॅव्हल्स कंपनी कार्यालय व ट्रॅव्हल्स गाडीच्या दर्शनी भागावर लावण्याबाबत आदेश देण्यात यावेत.
    प्रवासी दरफलक ट्रॅव्हल्स कंपनी कार्यालयात व ट्रॅव्हल्स गाडीच्या दर्शनी भागावर लावण्याचा प्रयोग सांगली जिल्ह्यातील आरटीओ कार्यालयाकडून झालेला आहे. अशाच प्रकारचा प्रयोग आपल्या कार्यालयाकडून राबविण्यात यावा. जेणेकरून प्रवाशांची लुटमार आणि फसवणूक होणार नाही. आमच्या या विनंती अर्जाचा सकारात्मक विचार होऊन ताबडतोब कार्यवाही व्हावी. तसेच या कार्यवाहीबाबत पत्रोत्तर व्हावे अशी विनंती प्रभारी अध्यक्ष, ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग व जिल्हाध्यक्ष, ग्राहक पंचायत महाराष्ट्र, सिंधुदुर्ग प्रा. एस. एन. पाटील आणि जिल्हा संघटक श्री. एकनाथ गावडे यांनी केली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments