कुडाळ राष्ट्रवादीची मागणी; अन्यथा १५ ऑगस्टला उपोषण करण्याचा इशारा…
कुडाळ,ता.०६: येथील प्रांताधिका-यांची चौकशी करणाऱ्या चौकशी समितीसह प्रांताधिका-यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.या मागणीसाठी १५ ऑगस्टला राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार आहे.असा इशारा कुडाळचे तालुकाध्यक्ष भास्कर परब व ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर यांनी दिला आहे.
कुडाळ प्रांत कार्यालयातील भ्रष्टाचाराबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने चौकशीची मागणी करून कारवाई करण्याची मागणी केली असताना चौकशी समिती नेमली.माञ चौकशी समितीने प्रांत कार्यालयातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणात क्लिनचीट देऊन प्रांताना पुन्हा कुडाळ कार्यालयातच हजर होण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी देऊन या प्रकरण हायवे बाधितांचा भ्रम निराश केला असुन भ्रष्टाचारी अधिकार्यांना पाठिशी घालण्याचे काम चौकशी समितीने केले आहे. चौकशी समिती व कुडाळ प्रांताधिकारी यांच्या वर कारवाई १३ ऑगस्ट २०२० पूर्वी करावी. अन्यथा १५ ऑगस्टला राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे तालुका अध्यक्ष भास्कर परब ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कनयाळकर यांनी जाहीर केले आहे.