अच्यूत भोसले; एनबीए मानांकन प्राप्त महाविद्यालय असल्याने नोकरीच्या संधी उपलब्ध…
सावंतवाडी,ता.०६: कोकणात प्रथमच अल्पावधीत “एनबीए” मानांकन प्राप्त केलेल्या सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटी या महाविद्यालयात मॅकेनिकल इंजिनिअंरीग,सिव्हील इंजिनिअरींग,इलेक्ट्रीकल्स इंजिनिअरींग आणि कॉम्प्युटर इंजिनिअरींग या अभ्यासक्रमाची ऑनलाईन प्रवेश प्रकीया सुरू करण्यात आली आहे.याबाबतची माहीती संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले यांच्याकडुन देण्यात आली आहे.
यात दहाची उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रथम वर्षात प्रवेश तर बारावी विज्ञान,एमसीव्हीसी,आयटीआय उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी थेट द्वितीय वर्षासाठी प्रवेश देण्यात येणार आहेत.महाविद्यालयाला एनबीए नामांकित मानांकन मिळालेले आहे.त्यामुळे या ठिकाणी गुणवत्तापुर्ण शिक्षणाच्या सोई प्राप्त होणार आहेत.तसेच विद्यार्थ्याना शासकीय व खासगी नोकरीमध्ये प्राधान्य मिळणार आहे. तर देशात आणि परदेशात उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार आहेत.या अभ्यासक्रमातील विविध उपक्रमांसाठी एआयसीटीई व एनबीए मार्फत अनुदान प्राप्त होणार आहे. विशेष म्हणजे या महाविद्यालयात शिक्षण घेणार्या पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्यूहद्वारे नोकरीच्या संधी प्राप्त होणार आहेत.तसेच सर्व प्रकारच्या शासकीय फी सवलती उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे.
या महाविद्यालय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शासकीय मान्यता प्राप्त उच्चशिक्षीत व अनुभवी शिक्षक वर्गाकडुन मार्गदर्शन केले जाणार आहे.त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा,असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.