Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
पेडणेतील घटना;मार्ग पुर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली सुरू…
पेडणे,ता.०६:कोकण रेल्वे मार्गावर पेडणे येथील बोगद्यात दरड कोसळली आहे. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या गाड्या जुन्या मार्गावरून वळविण्यात आल्या आहेत.ऐन चतुर्थीच्या तोंडावर हा प्रकार घडल्यामुळे आता सगळे मार्ग युद्धपातळीवर सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. काल रात्री उशीरा ही घटना घडली.या मार्गावर कोसळलेली दरड बाजूला करण्यासाठी रेल्वेचे अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील आहेत.लवकरात लवकर मार्ग पूर्ववत करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे,असे रेल्वेचे अधिकारी श्री एल.के. वर्मा यांनी सांगितले.
Download WordPress Themes Nulled and plugins.