राजन वराडकर; प्रशासनाकडून खबरदारी,घाबरून न जाण्याचे आवाहन…
मालवण ता.०६: शहरात आढळून आलेल्या तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या संबंधित व्यक्तींनी स्वतः पुढे येऊन आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी,असे आवाहन उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी केले आहे.दरम्यान शहरात रुग्ण आढळून आल्याने प्रशासन आवश्यक ती खबरदारी घेत असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये,असेही त्यांनी यावेळी सांगितले.याबाबत त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, शहरात आज दोन कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर नागरिकांमध्ये भीती आहे.मात्र बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.त्यामुळे बाधित व्यक्तींच्या कोणी संपर्कात आल्यास त्यांनी स्वतः पुढे येऊन आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी,तसेच कोणीही घाबरून न जाता आवश्यक ती खबरदारी बाळगावी,असे सांगितले.