संजय पडतेंची मागणी; क्लीनचिट दिली,तरी जनतेच्या नजरेत दोषी…
कुडाळ ता.०६: प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांना चौकशी समितीने क्लीनचिट दिली असली तरी जनतेच्या नजरेत त्या दोषीच आहेत.त्यामुळे त्यांची तात्काळ बदली करण्यात यावी,अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.याबाबतचे निवेदन त्यांनी प्रसिद्धीस दिले.
त्यात असे म्हटले आहे की, श्रीम.खरमाळे या कुडाळ उपविभागीय अधिकारी (प्रांत), या पदावर कार्यरत असून,त्यांच्या कामाबाबत लोकांमध्ये रोष निर्माण झालेला आहे.त्या प्रशासकीय कामात निर्दोष असल्या तरी जनतेच्या दृष्टीने दोषी आहेत. त्यामुळे त्यांची तातडीने बदली व्हावी,अशी मागणी आहे.त्यांची बदली झाल्यास लोकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण होईल. त्याचबरोबर प्रशासकीय कामामध्ये पारदर्शकता येईल,असेही त्यांनी म्हटले आहे.