Tuesday, March 18, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्या"त्या" भाजी व्यावसायिकांना चतुर्थीपर्यत तरी पुर्ववत जागेत बसवा...

“त्या” भाजी व्यावसायिकांना चतुर्थीपर्यत तरी पुर्ववत जागेत बसवा…

सर्वपक्षीय बैठकीत मागणी; मुख्याधिका-यांनी केली बाजारपेठेची पाहणी…

सावंतवाडी ता.०६: कोरोनाचे संकट असताना तसेच ऐन गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी भाजी मार्केटमध्ये बसणा-या व्यावसायिकांवर केलेली कारवाई चुकीची आहे.असा आरोप करीत त्यांना पुर्ववत जागा द्या,अशी मागणी आज येथे आयोजित सर्व पक्षीय बैठकीत उपस्थितांकडुन करण्यात आली.दरम्यान या गोष्टीत आम्हाला कोणतेही राजकारण करायचे नाही.त्यामुळे गरीब लोकांवर अन्याय करू नका,अशीही मागणी यावेळी करण्यात आली.तत्पूर्वी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या उपस्थितीत बाजारपेठेत जावून सर्व पक्षीयांकडुन पाहाणी करण्यात आली.

नगराध्यक्ष संजू परब यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.यावेळी जेष्ठ नगरसेविका आनारोजीन लोबो, शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ,जेष्ठ कायदेतज्ञ बापू गव्हाणकर,शिवसेना शहर अध्यक्ष बाबू कुडतरकर,राष्ट्रवादी ग्राहक सेलचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी,नगरसेवक शुभांगी सुकी, सुरेंद्र बांदेकर, भारती मोरे, अगस्तीन डिसोजा, प्रशांत कोठावळे, सत्यजित धारणकर, अशोक पवार,सुनिल पेडणेकर, विशाल सावंत, कृष्णा धुळपनावर दिनेश गावडे, मंगेश तळवणेकर, शैलेश गवंडळकर,अजय गोंधावळे, बंटी पुरोहित,आमिदी मेस्त्री, विनोद सावंत आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments