सतीश सावंत : कोसळलेल्या तटबंदीची शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून पाहणी
विजयदुर्ग, ता.६ : ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी खासदार विनायक राऊत हे येत्या दोन दिवसात केंद्रीय पुरातत्व विभागाकडे संपर्क साधणार आहेत अशी माहिती शिवसेना नेते आणि जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी आज दिली. त्यांनी आज विजयदुर्ग किल्ल्यातील ढासळलेल्या तटबंदीची पाहणी शिवसेना पदाधिकाऱ्यांना समवेत केली.
श्री सावंत म्हणाले, केंद्र शासनाच्या माध्यमातून या किल्ल्याच्या संवर्धनासाठी जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी खासदार विनायक राऊत हे पाठपुरावा करणार आहेत. तसेच कोसळलेल्या चिलखती तटबंदीची पाहणी करून त्याचा अहवाल खासदार राऊत यांना देण्यात येणार आहे हा ऐतिहासिक ठेवा जोपासण्याच्या दृष्टिकोनातून शिवसेनेच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत.
ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याच्या कोसळलेल्या चिलखती तटबंदी ची पाहणी आज सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी केली. त्यांच्यासमवेत शिवसेना उपजिल्हाप्रमुख विलास साळसकर,तालुकाप्रमुख मिलिंद साटम,अॅड.प्रसाद करंदीकर, जि.प.सदस्या वर्षा पवार,संतोष साटम,पुरळ विभाग प्रमुख संदीप डोळकर,विजयदुर्ग शाखा प्रमुख सुरेंद्र सागवेकर,दामाजी पाटील,सिध्देश डोंगरे,सचिन खडपे,अवधुत पाटील,सुलिन खडपे,सचिन पवार, उपतालुखाप्रमुख सुनिल जाधव,सलीम चौगुले आदी उपस्थित होते.
विजयदुर्ग किल्ल्या ची तटबंदी कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर खासदार विनायक राऊत हे बुधवारी पाहणी करण्यासाठी येणार होते मात्र त्यांना तातडीने एका बैठकीसाठी दिल्ली येथे जावे लागल्याने त्यांच्या आदेशानुसार आम्ही सर्व शिवसेना पदाधिकारी तटबंदीची पाहणी करून त्याचा अहवाल खा राऊत यांना येणार आहोत किल्ल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण या किल्ल्याच्या संवर्धनासाठी त्याने विशेष सकारात्मकता दाखवली आहे त्याचबरोबर खासदार विनायक राऊत यांनी ही विजय गेल्याच्या सर्वांगीण विकासासाठी व ऐतिहासिक ठेवण्याच्या संवर्धनासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे केंद्रीय पुरातत्व विभागाच्या माध्यमातून केंद्र शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी या किल्ल्याच्या संवर्धनासाठी असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले आहे विजयदुर्ग किल्ल्याचे संवर्धन करणे ही आमची जबाबदारी आहे त्यामुळे केवळ निवेदन देऊन आम्ही थांबणार नाही तर कोसळलेल्या तटबंदी सह संपूर्ण किल्ल्याचे संवर्धन कसे करता येईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आम्ही करणार आहोत असे सतीश सावंत यांनी सांगितले
विजयदुर्ग किल्ल्यातील दुसरी चिलखती तटबंदीचा बाहेरील भाग जमिनीपासून 30 ते 40 फूट भाग मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसात कोसळला.यामुळे आता वरील तटबंदी धोकादायक झाली आहे.तसेच बुधवारी रात्री सदर दरबार येथील वडाचे झाड किल्ल्याच्या भिंतीवर कोसळल्याने भिंतीचा काही भाग कोसळून ही भिंत कमकुवत झाली आहे.
किल्ल्यातील वाढते झाडांचे प्रमाणामुळे अनेक तटबंदी पोखरल्या जात आहेत.यामुळे अनेक तटबंदीला याचा धोका भविष्यात येणार आहे.यासाठी येथील तटबंदीवरील वाढलेली महाकाय झाडे यांचा कायमचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.पुरातत्वविभागाने याकडे गांर्भीयाने लक्ष वेळेत घालून या किल्ल्याची होत असणारी पडझड थांबविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे