सर्वपक्षीय बैठकीनंतर तोडगा; नगराध्यक्षांकडून विरोधकांना कोंडीत धरण्याचा प्रयत्न…

सावंतवाडी,ता.०६: भाजीविक्रेत्यांबाबत पावसाळयापर्यंत सकारात्मक निर्णय घेत त्यांना जुन्या जागेत बसवण्याची मागणी सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आली.तसे नगराध्यक्ष संजू परब यांनी जाहीर करावे,असे ठरले .परंतु आपण सहकारी नगरसेवकांशी चर्चा करून येत्या दोन दिवसात जाहीर करू,असे श्री.परब यांनी सांगितले. दरम्यान यावेळी झालेल्या चर्चेत नगराध्यक्ष परबांनी विरोधकांना कोंडीत धरण्याचा प्रयत्न केला.मात्र त्यांचा प्रयत्न ज्येष्ठ नगरसेविका आनारोजीन लोबो व ज्येष्ठ कायदेतज्ञ बापू गव्हाणकर यांनी ओळखला.व वैयक्तीक आरोप प्रत्यारोप नको,असे सांगुन त्यांनी सकारात्मक भूमिका घेण्याची विनंती केली.
सावंतवाडी भाजी मंडळी बाहेर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांना स्थलांतरित करून नगरपालिकेने त्यांची व्यवस्था भाजी मंडई मध्ये केली आहे. मात्र स्थलांतरित झाल्याने भाजी विक्रेत्यांचा धंदा होत नसून ऐन सणासुदिच्या तोंडावर त्यांच्यावर केलेली कारवाई चुकीची आहे. त्यामुळे भाजी विक्री धंदा पुन्हा पूर्वीच्या जागेवर बसवा, अशी मागणी गेले काही दिवस विरोधकांसह सर्वपक्षीय कडून केली जात होती. याच पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक पालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहात नगराध्यक्ष संजू परब यांच्या उपस्थित पार पडली.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ, शिवसेनेचे नेते तथा जेष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो, भारती मोरे दिपाली सावंत शुभांगी सुकी माधुरी वाडकर नगरसेवक सुरेंद्र बांदेकर बाबू कुडतरकर कायदेतज्ञ बापू गव्हाणकर माजी नगरसेवक सुनिल निरवडेकर राष्ट्रवादी व्यापार उद्योगसेलचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी, सत्यजित धारणकर, आॅगस्तिन फर्नांडिस, अमोल साटेलकर,विभावरी सुकी आदी उपस्थित होते.बैठकीपुर्वी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांना सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी भाजी मंडई मध्ये घेऊन जात भाजी विक्रेत्यांच्या समस्या दाखवून दिल्या. दरम्यान त्यानंतर पार पडलेल्या बैठकीमध्ये यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी झालेल्या चर्चेत नगराध्यक्ष श्री.परब यांनी उपस्थितांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी माजी नगरसेवक सुनील पेडणेकर यांनी गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर व्यापा-यावर केलेली कारवाई चुकीची आहे. रस्त्यावरील व्यापाऱ्यांना मार्केटमध्ये बसवल्याने त्यांच्याकडील भाजीची विक्री होत नाही. त्यामुळे यामध्ये त्यांची आर्थिक नुकसानी लक्षात घेऊन त्यांना चतुर्थीपर्यंत पूर्ववत जागा द्या, अशी मागणी केली.
ज्येष्ठ नगरसेविका शिवसेनेच्या नेत्या अनारोजीन लोबो म्हणाल्या, अतिक्रमणाबाबत आपण ठरवताना ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या गोष्टी वगळून त्यामध्ये इतर गोष्टी टाकण्यात आल्यामुळे हा प्रकार चुकीचा आहे. मात्र अतिक्रमणाबाबत केलेली कारवाई आजही चुकीची नाही. परंतु ती करताना आजची वेळ योग्य नाही. आज सावंतवाडीमध्ये कितीतरी अनधिकृत दुकाने आहेत. मात्र गरिबावरच कारवाई का करण्यात आली, तर एक अधिकारी म्हणून मुख्याधिकारी यांना नगरसेवकांनी भाजी मार्केटमध्ये बोलूनही हे तेथे आले नाही. हा लोकप्रतिनिधीचा अपमान आहे. असे शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी सांगितले. प्रत्येक वेळी सहकार्य करुनही व्यापार्यावरच कारवाईचा बडगा उगारणे चुकीचे असल्याचे पुंडलिक दळवी म्हणाले.
तर कायदेतज्ञ श्री.गव्हाणकर म्हणाले, सावंतवाडीचा विकास व्हावा ही सर्वांची इच्छा आहे. त्यामुळे एक नगराध्यक्ष म्हणून भाजी विक्रेत्यांना पावसाळ्यापर्यंत पूर्वीच्या जागी बसवा. मात्र कोणी त्यामध्ये श्रेयवाद न घेता एक एक पावले मागे या असे सांगितले.
सर्वांचं मंडळ ऐकून घेतल्यानंतर नगराध्यक्ष श्री परब यांनी आपली बाजू मांडली ते म्हणाले भाजी विक्रेत्यांना पूर्वीच्या जागी बसण्यासाठी विनंती अर्ज द्यायला सांगितला होता त्यासाठी तीन वेळा निरोप पाठवूनही त्यांनी अर्ज दिला नाही मात्र त्यानंतर आम्ही केलेली कारवाई ही चुकीची आहे का दुसरीकडे आज ज्याप्रमाणे सर्वपक्षीयांनी आपली भेट घेऊन विनंती केली असेच विनंती भाजीविक्रेत्यांची भेट घेऊन विषयी न वाढवता केली असता यामध्ये तोडगा निघाला असतात मात्र तसे न करता त्याठिकाणी निव्वळ राजकारण करण्यात आले असे सांगितले. तसेच यावर कायदे तज्ञ श्री गव्हाणकर यांनी उत्तर देण्याची विनंती त्यांनी केली.
श्री गव्हाणकर यांनी कोणीही राजकारण न करता व श्रेयवाद न देता नगराध्यक्षांनी धोरणात्मक निर्णय घेऊन पावसाळ्यापर्यंत व्यापाऱ्यांना पूर्ववत जागा द्यावी असे सांगितले.यावर येत्या दोन दिवसात याबाबत सहकारी नगरसेवकांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे नगराध्यक्ष संजू परब यांनी सांगत बैठक आटोपती घेतली