कोनशी पंचक्रोशीतील कलाकारांना दिली आर्थिक मदत…
सावंतवाडी ता.०६: कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळलेल्या व्यावसायिक दशावताऱ्यांच्या मदतीसाठी मुंबईतील पार्वतीबाई बाबाजी सावंत फाउंडेशन धावून आल्याने त्यांचे कोनशी पंचक्रोशीतील व्यावसाईक दशावतारी कलाकारानी आभार मानले.कोनशी गावचे सुपुत्र दशावतार कलेतील भीष्माचार्य दादा राणे-कोनसकर यांनी ग्रामीण भागातील व्यावसाईक दशावतार कलावंतांची व्यथा फाउंडेशन समोर मांडली होती.
लॉकडाऊन काळातील आर्थिक अडचण विचारात घेऊन फाउंडेशन ट्रस्ट चे संचालक सिमरन सावंत, नीलकंठ सावंत, शुभम सावंत यांच्या सहकार्याने कोनशी पंचक्रोशीतील १७ दशावतारी व्यावसाईक कलालाकारांना प्रत्येकी१हजार २५०रुपये ची आर्थिक मदत केली.
विषेश म्हणजे ही रक्कम प्रत्येकाच्या खात्यात जमा करण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पार्वतीबाई फाउंडेशनने ग्रामीण भागातील व्यावसाईक दशावतारी कलावंतांना आर्थिक मदतीचा हाथ दिल्याने या कलाकारांनी दादा राणे व फाउंडेशनचे आभार मानले.