ओरोस,ता.०६: जिल्हा परिषदेच्या शालेय क्रीडा स्पर्धा दरम्यान घेण्यात येणाऱ्या ‘ज्ञानी मी होणार’ या प्रश्न मंजुषा कार्यक्रमावर आधारीत मार्गदर्शक पुस्तिका दोडामार्ग तालुक्यातील वझरे हळदीचा गुंडा या शाळेचे शिक्षक तुषार भगवान पवार यांनी विद्यार्थी शिक्षक यांच्यासाठी बनविली आहे. या पुस्तिकेचे प्रकाशन शिक्षण सभापती सावी लोके यांच्याहस्ते गुरुवारी करण्यात आले.
यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस, निरंतर शिक्षणाधिकारी अनिल टिजारे, शिक्षण समिती सदस्य सरोज परब, विष्णुदास कुबल, सुधीर नकाशे यांच्यासह गट शिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख उपस्थित होते. यावेळी आंबोकर यांनी ही पुस्तिका जिल्हास्तरिय ज्ञानी मी होणार या स्पर्धेसाठी विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी अधिक उपयुक्त असल्याचे सांगितले.