Sunday, March 16, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यावाढीव वीज बिलांसंदर्भात उद्या मालवणात ग्राहकांची सभा...

वाढीव वीज बिलांसंदर्भात उद्या मालवणात ग्राहकांची सभा…

व्यापारी संघाचे आयोजन ; महावितरणचे अधिकारी शंकांचे निरसन करणार…

मालवण, ता. ६ : वीज ग्राहकांच्या वाढीव वीज बिला संबंधीच्या तक्रारींचे निराकरण करून घेण्यासाठी मालवण व्यापारी संघाच्या वतीने ७ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता दैवज्ञभवन येथे वीज ग्राहकांची सभा आयोजित करण्यात आली आहे.
या सभेत वीज बिला संबंधीत ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी महावितरणचे उपविभागीय अभियंता श्री. साखरे व श्रीमती. पाताडे उपस्थित राहून सर्वांचे शंका निरसन करणार आहेत. तरी सर्व व्यापारी बांधवांनी कोविड -१९ अंतर्गत लागू नियमावलीचे पालन करून या सभेस उपस्थित रहावे. सभेस येताना सोबत आपण भरलेले शेवटचे बिल आणि चालू बिल व आजच्या मीटर रिडिंगचे छायाचित्र घेऊन यावे असे आवाहन व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरूरकर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments