सर्व गाड्या मडगाव,लोंढा,मिरज मार्गे धावणार…
कणकवली, ता.६ : पेडणे येथील बोगद्यात दरड कोसळल्याच्या घटनेनंतर कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक 20 ऑगस्ट पर्यंत बंद राहणार आहे. या कालावधीत कोरे मार्गावरील सर्व गाड्या मडगाव लोंढा मिरज मार्गे वळविण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती कोकण रेल्वे कडून देण्यात आली.
कोरोनामुळे राज्यातील रेल्वे वाहतूक बंद आहे. मात्र लांबपल्ल्याच्या गाड्या सुरू आहेत. यामध्ये कणकवलीत मंगला एक्सप्रेस तर कुडाळ मध्ये नेत्रावती एक्सप्रेस गाडी थांबले. या गाड्यातून चाकरमानी येत आहेत. मात्र पेडणे बोगद्यातील दरड हटविणे आणि दुरुस्ती कामासाठी काही दिवस लागणार असल्याने कोरे मार्गावरील वाहतूक 20 ऑगस्ट पर्यंत बंद राहणार आहे.