वाहतूक तीन तास ठप्प : पालिकेकडून तात्काळ दखल घेत झाड हटविले…
वेंगुर्ला,ता.०७:वेंगुर्ले-भाटवाडी वेशी येथे मुख्य रस्त्यावर मोठे वडाचे झाड आज सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास जमीनदोस्त झाले. त्यामुळे या मार्गावरील सर्व वाहतूक ठप्प झाली होती. तीन तासा नंतर ही वाहतूक सुरळीत करण्यात आली.
वेंगुर्ले-कुडाळ या मुख्य मार्गावरच हे झाड रस्त्यावर पडल्याने वहातूक पुर्ण पणे थांबली. त्या दरम्यान या ठिकाणी वाहने किंवा अन्य कुणी जात नसल्याने अनर्थ टळला. दरम्यान नगरपरिषदेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने या बाबत माहिती मिळताच तात्काळ काम चालू केल. यावेळी स्वता नगराध्यक्ष राजन गीरप, स्थानिक नगरसेवक प्रशांत आपटे, साक्षी पेडणेकर, नगरपालिका कर्मचारी सागर चौधरी यानी पलिकेची सर्व यंत्रणा वापरून ९ वाजता मार्ग मोकळा केला. मात्र या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक तब्बल तिन तास ठप्प राहिली.