जिल्हाधिकारी कार्यालयाची माहीती;महसूल विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश…
सिंधुदुर्गनगरी,ता.०७: १ ऑगस्ट या महसूल दिनाचे औचित्य साधत जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी २०१९-२० या आर्थिक वर्षात चांगले काम करहणाऱ्या १३ अधिकारी-कर्मचारी यांना पुरस्कार जाहिर केले आहेत. यात उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ जयकृष्ण फड, कणकवली तहसीलदार आर जे पवार, दोडामार्ग नायब तहसीलदार संजय कर्पे यांचा समावेश आहे.
महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी यांनी आर्थिक वर्षात केलेल्या कामांचे मूल्यांकन करून त्यातील सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचा गौरव करण्यासाठी पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते. १ ऑगस्ट या महसूल दिनाचे औचित्य साधुन हे पुरस्कार जाहिर करून त्याचे वितरण केले जाते. २०१९-२० चे हे पुरस्कार जाहिर करण्यात आले नव्हते. जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांनी गुरुवारी याची घोषणा केली.
यात जिल्हा कार्यालयातील आस्थापना शाखेतील लघुलेखक एस एस इंगळे, देवगड तहसील कार्यालयातील अव्वल कारकुन व्ही आर वेंगुर्लेकर, सावंतवाडी तालुक्यातील मंडळ अधिकारी जी आर गुरव, वेंगुरला तहसील कार्यालय लिपिक अमिता पेडणेकर, कुडाळ तालुक्यातील तलाठी श्रीमती यू एम परब, सावंतवाडी तहसील कार्यालय वाहन चालक एस बी परब, जिल्हा कार्यालयातील नाईक एस बी बुकम, वैभववाडी तहसील कार्यालयाचे शिपाई ए ए गुरव, मालवण तहसील कार्यालय अंतर्गत येणारे पोलिस पाटील पांडुरंग चव्हाण, कणकवली तहसील कार्यालय अंतर्गत येणारे कोतवाल एस पी राणे यांचा समावेश आहे.