शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडतेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी…
कुडाळ,ता.०७: किल्ले रायगडच्या धर्तीवर ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याचे जतन व संवर्धन करा,त्यासाठी आवश्यक असलेली निधीची तरतूद करा,अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
त्यांनी याबाबत निवेदन दिले आहे. त्यात असे नमुद करण्यात आले आहे की,छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या आरमाराची राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्या विजयदुर्ग किल्ल्याकडे पुरातन विभागाचे दुर्लक्ष झाल्यामुळे किल्ल्याचा काही भाग दोन दिवसापुर्वी कोसळला आहे.त्यामुळे होणारी पडझड लक्षात घेता त्या किल्ल्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे. त्यासाठी किल्ले रायगडच्या धर्तीवर या किल्ल्याच्या डागडुजीसाठी योग्य ते नियोजन करा,असे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे.