Tuesday, March 18, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याभाजप रेडी ग्राम कमिटी तर्फे कोविड योध्दा यांचा गौरवपत्र देऊन सन्मान...

भाजप रेडी ग्राम कमिटी तर्फे कोविड योध्दा यांचा गौरवपत्र देऊन सन्मान…

प्रितेश राऊळ यांच्या माध्यमातून आशा ताईंना छत्र्याचे वाटप…

वेंगुर्ले,ता.०७: अयोध्या येथील श्री रामजन्मभूमीवर श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाच्या सोहळयाचे औचित्य साधून प्राथमिक आरोग्य केंद्र रेडी यांच्या सभागृहामध्ये भारतीय जनता पार्टी रेडी ग्राम कमिटीच्यावतीने कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर काम केलेल्या कोरोना योद्धांना गौरवपत्र,गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
रेडी येथील या कार्यक्रमामध्ये सर्वश्री रेडी ग्रामपंचायत सरपंच रामसिंग राणे, डॉ.एस.के.नवार, डॉ.रश्मी शुक्ल यांना शाल,श्रीफळ व गौरवपत्र, गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन भाजप,वेंगुर्ला तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे यांनी केले. त्याच प्रमाणे रेडी गावचे सरपंच रामसिंग राणे, डॉ.एस.के नवार, डॉ.रश्मी शुक्ल, रेडी जिल्ह परिषद सदस्य,माजी आरोग्य,शिक्षण,सभापती प्रितेश राऊळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कोरोना योद्धा म्हणून डॉक्टर,आरोग्य कर्मचारी,आरोग्य सेवक, आरोग्य सेविका,आशा,सरपंच,पोलीस अधिकारी, यांना गौरवपत्र,गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये ए.ए.तोस्स्कर, एम.बी.नाईकगावकर, एन.एम.धुळगुंडे, ए.ए.चव्हाण, एस.ए.कळगुंटकर, ए.एन.गोसावी, एस.एम.वारंग, पी.पी.गावडे, एम.व्ही.गंवडे, जे.जे.कदम, डी.एम.नाईक, के.डी.परब, आर.आर.जाधव, व्ही,एस.धानजी, जे.जे. राऊळ, एस.बी.तिवरेकर, एस.एस.सोपटे, एस.एस.रेडकर,ए.ए.मेस्त्री,पी.पी रेडकर,एस.एस.मेस्त्री,जे.जे.राणे.अशा 25 कोरोना योध्दांचा उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या मान्यवरामध्ये वरील मान्यवरांच्या बरोबर व्यासपीठावर,भाजप,रेडी जि.प.विभागीय उपाध्यक्ष जगन्नाथ राणे, भाजप,रेडी ग्राम कमिटी अध्यक्ष ज्ञानेश्वर केरकर, उपाध्यक्ष ओंकार कोनाडकर, शिरोडा गावचे सरपंच मनोज उगवेकर, रेडी ग्रामपंचायत सदस्य शैलेश तिवरेकर, भाजप रेडी ग्राम कमिटी महिला आघाडी पदाधिकारी सौ.धुरी, भाजप, वेंगुर्ला तालुका युवा मोर्चा आघाडी उपाध्यक्ष सौरंभ नागोळकर उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये कोरोना योद्धा आशा ताईना गौरवपत्रा सोबत रेडी जि.प.सदस्य,माजी आरोग्य,शिक्षण,सभापती प्रितेश राऊळ यांच्या माध्यमातून छत्र्यांचे वाटप करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments