भुईबावडा येथील शाखा उपअभियंता असून नसल्यासारखे; वीज ग्राहकांचा संतप्त सवाल…
वैभववाडी/पंकज मोरे,ता.०७:तालुक्यात सलग पाच दिवस वादळी वा-यासह जोरदार पाऊस सुरू आहे. या वादळी वा-यामुळे भुईबावडा पंचक्रोशीत तब्बल पाच दिवस विजेचा लपंडाव सुरू आहे. तसेच येथील वीज वितरणच्या शाखा उपअभियंत्या अपवादात्मक हजेरी लावतात. वीज संबंधी तक्रारी मांडायच्या कोणाकडे? असा सवाल ग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे.
तालुक्यात गेल्या पाच दिवसापासून वादळी वा-यासह मुसळधार पावसाने अक्षरशः दाणादाण उडविली आहे. या वादळी वा-याचा फटका भुईबावडा पंचक्रोशीला बसल्याने विजेचा लपंडाव सुरू आहे. तर पहिलीवाडी सीमेवाडीतील लोकांना लाईटीविना अंधारात चाचपडत बसावे लागत आहे.
वीज वितरणचा उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार सुरू आहे. तालुक्यात वीज वीतरणच्या कारभाराचा बट्ट्याबोळ झाला आहे.