Sunday, March 16, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यामाजगाव उद्यमनगरातील विद्युत पुरवठा सुरळीत करा...

माजगाव उद्यमनगरातील विद्युत पुरवठा सुरळीत करा…

अशोक दळवींचे महावितरणला निवेदन; अन्यथा ग्राहकांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल…

सावंतवाडी ता.०७:माजगाव उद्यमनगर येथे नवीन उपकेंद्र कार्यान्वित करून सुद्धा गेले आठ दिवस परिसरातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे.याचा परिणाम त्या ठिकाणी असलेल्या उद्योग व्यवसाय होत आहे.त्यामुळे हा पुरवठा तात्काळ सुरळीत करण्यात यावा,अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी महावितरणकडे केली आहे.दरम्यान दोन दिवसात योग्य ती कार्यवाही न केल्यास महावितरणला ग्राहकांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल,असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.याबाबतचे निवेदन त्यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
त्यात असे म्हटले आहे की,माजगाव उद्यमनगर येथे नवीन उपकेंद्र कार्यन्वित करण्यात आले.या उपकेंद्रा मार्फत माजगाव उद्यमनगर तसेच परिसरातील गावांना विद्युत पुरवठा केला जात आहे. मात्र गेले आठ दिवस हा पुरवठा खंडित करून अन्य विभागाकडे वळवला जात आहे.त्यामुळे येथील ग्राहकांना वारंवार काळोखात राहवे लागत आहे.संबंधित उपकेंद्र नसतानासुद्धा गावांमध्ये सुरळीत विद्युत पुरवठा होत होता.मात्र नवीन उपकेंद्र कार्यान्वित झाल्यानंतर उलट वारंवार विद्युतप्रवाह खंडित होत असल्यामुळे ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.त्यामुळे याठिकाणी असलेल्या उद्योग व्यावसायिकांचा व परिसरातील ग्रामस्थांचा विचार करता हा विद्युत पुरवठा वारंवार खंडित न करता सुरळीत सुरू ठेवून त्यांना सहकार्य करावे,याबाबत लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा ग्रामस्थांच्या रोषाला महावितरणला सामोरे जावे लागेल,असे म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments