संजू परब; विरोध करणारे व्यापारी नाहीत,तर नको त्या लोकांकडुन नाहक राजकारण…
सावंतवाडी ता.०७: येथिल भाजी मार्केटमध्ये माझ्याकडुन करण्यात आलेल्या कारवाईच्या निर्णयाचे तेथिल स्थानिक दुकानदारांनी स्वागत केले आहे.त्यामुळे जे व्यावसायिक नाहीत,आणि नाहक राजकारण करीत आहेत,त्यांच्या दबावाला मी बळी पडणार नाही.विरोध झाला म्हणून घाबरणार नाही.मी घाबरणारा माणूस नाही,अशी प्रतिक्रीया सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे दिली.दरम्यान आपल्या कारवाईचे स्वागत करणार्या व्यापारी आणि दुकानदारांचे त्यांनी आभार मानले.तसेच नव्याने कॉम्प्लेक्स उभारल्यानंतर या ठीकाणी कोणावर अन्याय होणार नाही,असा शब्द त्यांनी यावेळी दिला.तसेच २६ ऑगस्ट नंतर शहरात २७ ठीकाणी बसलेल्या भाजी विक्रेत्यांची दुकाने बंद केली जाणार आहेत.त्यामुळे येथिल व्यापार्यांचा निश्चीतच व्यापार होईल,असेही त्यांनी सांगितले.
श्री.परब यांची आज येथिल व्यापार्यांच्या एका गटाने भेट घेतली.यावेळी त्यांना श्री.परब यांनी मार्गदर्शन केले.ते म्हणाले,आम्हाला पाठीबां देणार्या व्यापार्याचे मी अभिनंदन करतो.त्यांचे आभार मानतो,काही झाले तरी आम्ही आता त्यांच्यावर अन्याय होवू देणार नाही.त्यांनी मी केलेल्या कारवाईचे समर्थन केले आहे.त्यामुळे येणार्या काळात सर्व लोकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.जे लोक विरोध करीत होते.ते राजकीय अथवा बाहेरचे होते. त्यातील एकाचेही या ठीकाणी दुकान नाही,असे असताना आज जे व्यापारी मला भेटले ते सर्वजण स्थानिक आहेत.त्यांनी माझ्या कारवाईचे स्वागत केले आहे.
श्री.परब पुढे म्हणाले ,आज तब्बल ८७ लोकांनी मला कारवाई योग्य असे पत्र दिले आहे. तर फक्त तिघांनी या पत्रावर सही केलेली नाही.त्यामुळे त्याच बरोबर सायंकाळी पाच नंतर बाहेर बसणार्या काही भाजी विक्रेत्यांवर कारवाई करावी,अशी त्यांनी मागणी केली आहे. त्यानुसार आवश्यक ती नोटीस काढुन संबधितांवर कारवाई करण्यात येणार,
यावेळी नगरसेवक परिमल नाईक,नासिर शेख,आनंद नेवगी,अजय गोंधावले,बंटी पुरोहीत,अमित परब, केतन आजगावकर आदी उपस्थित होते