विवाहितेला अश्लील मॅसेज पाठविल्या प्रकरणी परदेशातील युवकावर गुन्हा दाखल…

2

 

सावंतवाडीतील घटना; त्रासाला कंटाळून महिलेची पोलीस ठाण्यात धाव…

सावंतवाडी ता.२८: सोशल मीडियावरून शहरातील विवाहीतेला अश्लील संदेश पाठविल्या प्रकरणी परदेशातील एका युवकावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गेले चार ते पाच दिवस संबंधित युवकाकडून हा प्रकार सुरू होता.त्यामुळे कंटाळलेल्या महिलेने आज येथील पोलिस ठाण्यात धाव घेत संबंधितांच्या विरोधात तक्रार दिली.त्यानुसार विनयभंग व सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी त्या युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत खोत यांनी दुजोरा दिला आहे.
गेले चार ते पाच दिवस संबंधित संशयिताकडून हा प्रकार सुरू होता.असे त्या तक्रारदार महिलेचे म्हणणे आहे.त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान तो नेमका युवक कोण याची माहिती घेऊन पुढील तपास केला जाईल,असे श्री.खोत यांनी सांगितले.

52

4