मुंबई, ता.३० : एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या तीन महिन्यापासून पगार प्रलंबीत आहे. तो येत्या ७ आक्टोबर पर्यंत द्यावा, अन्यथा येत्या ९ आक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांतर्फे राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. असा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार मान्यता प्राप्त संघटनेचे सरचिटणिस हनुमंत ताटे व राज्याध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिला आहे.
याबाबत संघटनेने दिलेली माहिती अशी की, कोरोना काळात एसटीची अत्यावश्यक सेवा सुरू होती. या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी योगदान दिले आहे. तरीही गेली तीन महिने वेतन मिळालेले नाही. त्यामुळे कर्मचारी हवालदिल झाले आहेत. वेतन कायद्यानुसार एसटी महामंडळाने वेळेत वेतन देणे बंधनकारक आहे. राज्य शासनाने वेतनासाठीही निधी दिलेला नाही.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, परिवहन मंत्र्यांशी संघटनेने पत्रव्यवहार केला आहे, मात्र अद्याप वेतन मिळालेले नाही. येत्या ७ आक्टोबरपर्यंत प्रलंबीत वेतन द्यावे अन्यथा ९ आक्टोबरपासून संघटनेचे पदाधिकारी राज्यभरातील विभागात कार्यालयासमोर उपोषण करण्यात येणार आहे.
अन्यथा ९ ऑक्टोंबरपासून एस.टी. कर्मचाऱ्यांचे आंदोलन…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES