वैभववाडी,ता.०१: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा व सध्याचे ऑनलाईन कला अध्यापन या विषया संदर्भात नुकतीच गुगल मिट च्या माध्यमातून ऑनलाईन सभेचे आयोजन करण्यात आले होते.
कोरोनाच्या महामारीत सर्व स्तरावर आपले कर्तव्य बजावताना मृत्युस सामोरे गेलेल्या सर्वांना शाब्दिक श्रद्धांजली अर्पण करून सभेची सुरवात कला संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री. रुपेश नेवगी यांनी केली. शिवाय कोरोनाच्या या काळात यशस्वी सेवा बजावणाऱ्या शिक्षक कोविड योध्यांचे अभिनंदन देखील कोकण विभाग अध्यक्ष श्री. बी. जी. सामंत यांनी केले. काही महिन्यांपूर्वी यशस्वीरित्या पार पडलेल्या ४१ व्या राज्यस्तरीय कलाशिक्षक परिषदेतील काही गोष्टींचा आधावा या सभेत घेण्यात आला. सध्या सुरू असलेले कला विषयाचे ऑनलाईन अध्यापन व विद्यार्थ्यांचा सहभाग यावर सर्वांनी आपली मते व्यक्त केली.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्फत प्रसारित झालेल्या अध्ययन-अध्यापन अहवालात शालेय विषयांचा अभाव तसेच इतर अनेक त्रुटी असल्याचे श्री. प्रसाद राणे यांनी लक्षात आणून दिले. तसेच संचमान्यतेतील त्रुटी व भविष्यातील कला विषयाचे महत्त्व यांचा सर्वांनी गांभीर्याने विचार करुन सर्व कला शिक्षक, कला संघटना या सर्वांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुन्हा एकदा आपल्या मागण्यांबाबत आवाज उठवून नवीन शैक्षणिक धोरणाचा सर्वांनी अभ्यास करून कला विषयाचे स्थान टिकवणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगितले. या विषया संदर्भात लवकरच आपण मा.मुख्यमंत्री यांच्याची भेट घेणार असल्याचे श्री. नेवगी यांनी सांगितले.
या सहविचार सभेस श्री. बी.जी.सामंत(अध्यक्ष कोकण विभाग), श्री. रुपेश. नेवगी (जिल्हा अध्यक्ष), श्री.प्रसाद राणे. (उपाध्यक्ष), श्री.संभाजी कोरे ( सहसचिव) श्री.राजेंद्र कोयंडे (देवगड ) श्री.प्रसाद राणे(सावंतवाडी ) ,श्री.विवेकानंद सावंत (सावंतवाडी)श्री.वसंत मेस्त्री (मालवण) श्री. गावीत वाय. एस. (दोडामार्ग )श्री. सावंत एल.के. श्री.चोरगे एम एस ( वैभववाडी ) इत्यादी तालुका प्रतिनिधी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा कलाध्यापक संघाची ऑनलाईन सहविचार सभा संपन्न…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES