Tuesday, June 17, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याभाजपाच्या सिंधुदुर्ग जिल्हा बुथरचना संयोजकपदी महेश सारंग यांची निवड

भाजपाच्या सिंधुदुर्ग जिल्हा बुथरचना संयोजकपदी महेश सारंग यांची निवड

सावंतवाडी, ता.०१: भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग बूथ रचना जिल्हा संयोजक पदी

महेश सारंग यांची निवड करण्यात आली आहे.यापूर्वी त्यांच्यावर जिल्हा चिटणीस पदाची जबाबदरी असून, त्यात ही अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.त्याबाबतचे पत्र जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्याकडून नुकतेच प्राप्त झाले आहे.ते सावंतवाडी,कुडाळ, कणकवली विधानसभा मतदार संघात संघटन पर्व २०२० अंतर्गत बूथ रचना तसेच शक्तीकेंद्रप्रमुख नव्याने गठीत करणार आहेत.
भारतीय जनता पार्टी देशात व राज्यात पहिल्या क्र. पक्ष बनला आहे.पक्षासाठी आगामी ३ वर्ष महत्त्वाची आहेत. त्यामुळे जिल्हापरिषद, ग्रामपंचायत, नगरपरीषद, सहकार क्षेत्र या सर्व निवडणुका आगामी काळात होणार असून यासाठी बूथ रचना महत्त्वाची आहे.त्यामुळे महेश सारंग यांच्यावर जिल्हा संयोजकाची जबाबदारी देण्यात आली आहे. यासाठी तिन्ही विधानसभा मतदार संघात विधान सभा संयोजक नेमण्यात आले असून, यात सावंतवाडी विधानसभा मतदार संघासाठी प्रमोद कामत, कुडाळ विधानसभा मतदार संघासाठी अशोक सावंत, कणकवली विधानसभा मतदार संघासाठी संदेश उर्फ गोटया सावंत यांची निवड करण्यात आली आहे.
ही निवड जिल्हाध्यक्ष राजन तेली व आमदार नितेश राणे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली आहे. याबद्दल महेश सारंग यांच्या सह सर्व विधानसभा संयोजकांचे भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी यांचेकडून अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments