Tuesday, June 17, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासावंतवाडी येथे आयोजित रक्तदान आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद...

सावंतवाडी येथे आयोजित रक्तदान आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद…

जिल्ह्यात लवकरात लवकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे; केली मागणी…

सावंतवाडी ता.०१:सिंधुदुर्गात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय व्हावे,यासाठी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी पुकारलेल्या रक्तदान आंदोलनाला उस्फुर्त प्रतिसाद लाभला.दरम्यान याप्रसंगी मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी गौतम माठेकर, रॉक डान्टस, पार्थिल माठेकर, अभी गवस, मेहर पडते, रोहित राऊळ, अर्चित पोकळे, राघू चितारी, अनिकेत पाटणकर, दिग्विजय मुरगूड, आकाश सासोलकर, ओंकार आगोळकर आदी उपस्थित होते.
ग्रामसभा, पंचायत समिती, नगरपालिका यांचे १३० ठराव,नागरिकांनी तत्कालीन मुख्यमंत्र्याना लिहिलेले २५ हजार पोस्ट कार्ड,उपोषणे तसेच मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांना आतापर्यंत प्रत्यक्ष भेटून निवेदने देण्यात आली.या जनरेटयाला देखील शासनाकडून आवश्यक,असा तत्पर प्रतिसाद मिळाला नाही.जिल्ह्याची निकड लक्षात घेता सिंधुदुर्गात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणे गरजेचे आहे.या मागणीसाठी जिल्ह्यातील युवकांनी सकारात्मक तसेच अभिनव असे रक्तदान आंदोलन पुकारले.याची सुरुवात सावंतवाडीतून करण्यात आली असून,पुढे जिल्हाभर हे आंदोलन सुरू राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments