सलग तिसर्या दिवशी कारवाई; ६४०० रूपयांचा दंड वसूल…
कणकवली, ता०१ः शहरात सलग तिसर्या दिवशी विनामास्क फिरणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. आज ३२ जणांकडून प्रत्येकी २०० रूपयांप्रमाणे ६४०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आली. कणकवली नगरपंचायतीच्या पथकाने पोलिस प्रशासनाच्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आली.
शहरात फिरणारे अनेक जण विनामास्क होते. तर काहींनी मास्क गळ्यात तर काहींनी तोंडाखाली मास्क अडकवले होते. या सर्वांवर प्रत्येकी २०० रूपयाप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली. या मोहीमेत वाहतूक पोलिस विश्वजित परब, संदेश आबिटकर यांच्यासह नगरपंचायतीचे सतीश कांबळे, प्रवीण गायकवाड, रवी म्हाडेश्वर, प्रशांत राणे, प्रकाश राठोड यांनी सहभाग घेतला.